Ad will apear here
Next
केक कापून साजरा केला शाळेचा पहिला दिवस
इस्लामपुरात मुक्तांगण प्ले स्कूल मध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी केक कापून आनंद साजरा करण्यात आला

इस्लामपूर (सांगली) : शाळेचा पहिला दिवस म्हटले, की शाळांमध्ये लहान मुलांचा  रडण्याचा आवाज येतो. पण इस्लामपूरमधील मुक्तांगण प्ले स्कूलच्या  आवारातील चित्र काहीसे वेगळेच होते. या शाळेत पहिल्या दिवशी केक कापून आनंद साजरा करण्यात आला. 

वृक्षारोपण करताना पालक व इतरशाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. शिक्षणातील आपले पहिले पाऊल टाकताना या चिमुकल्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. येथील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात चार वर्षांच्या आतील मुलांसाठी खेळातून शिक्षण देण्यात येते. शाळेच्या पहिल्या दिवशी  सकाळी मुले आपापल्या पालकांसोबत शाळेत आली. शाळेतील खेळणी, गाड्या, झोपाळे, घसरगुंडी पाहून मुले हरखून गेली. शाळेच्या आवारात रडणारी मुले हे चित्र नव्हतेच मुळी. 

प्रतिमेचे पूजन करताना शाळेच्या अध्यक्षा सरोजनी मोहितेनवीन खेळणी पाहून मुले पहिल्या दिवशी छान रमली. मुक्तांगणच्या आवारात असलेल्या आकर्षक बाग, रंगीबेरंगी फुलझाडे यांच्यामुळे वातावरण अधिकच प्रसन्न वाटत होते. शाळेच्या आवारात आकर्षक सजावट करण्यात आली होती. शाळेच्या संचालिका वर्षाराणी मोहिते म्हणाल्या, ‘गेली सहा वर्षे आम्ही मुलांचे व्यक्तिमत्व घडवत आहोत. यासाठी पालक आणि शिक्षकांचा समन्वय साधून आम्ही विविध उपक्रम राबवतो. मुलांना शिक्षणातील वेगवेगळे अनुभव देतो. यातून आदर्श नागरिक घडवण्यासाठी प्रयत्न केले जातात’. पालक प्रदीप व जानव्ही बावचकर यांनी वृक्षारोपण केले. प्रशालेच्या अध्यक्षा सरोजनी मोहिते यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. विनोद मोहिते यांनी स्वागत केले.              
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZKDBD
Similar Posts
मुक्तांगण निर्माण करतेय इस्लामपूरची वेगळी ओळख इस्लामपूर (सांगली) : येथील ‘मुक्तांगण प्ले स्कूल’ला माजी ग्रामविकासमंत्री अण्णा डांगे व आमदार जयंत पाटील यांनी भेट दिली. ‘बालशिक्षणाच्या चळवळीत सहज शिक्षण देताना " ‘मुक्तांगण’ इस्लामपूर शहराची वेगळी ओळख निर्माण करत आहे,’ असे मत अण्णा डांगे यांनी व्यक्त केले. इस्लामपुरात गेल्या सहा वर्षांपासून
चिमुकल्यांनी अनुभवला वारी सोहळा इस्लामपूर (सांगली) :   आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर येथील ‘मुक्तांगण प्ले स्कूल’मधील चिमुकल्यांनी एक जुलै रोजी वारी सोहळा अनुभवला. प्रशासकीय इमारतीच्या परिसरात असलेल्या या शाळेत, चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना खेळातून शिक्षण दिले जाते.  पालखी सोहळ्यासाठी या चिमुकल्या वारकऱ्यांनी साडी, धोतर-शर्ट असा वेश परिधान केला होता
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात रत्नागिरी अव्वल इस्लामपूर : पेठ नाका येथील व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालयात ४२व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात रत्नागिरी जिल्ह्याने विजेतेपद मिळवले. प्रयोगशाळा सहायक, प्राथमिक विद्यार्थी गट व लोकसंख्या शिक्षण साहित्य प्रदर्शन या गटात रत्नागिरीतील शाळांनी क्रमांक मिळवले
वर्धापनदिनानिमित्त नवीन इमारतीचे उद्घाटन इस्लामपूर : आधार हेल्थ केअर सर्व्हिस सेंटरने वर्षभर केलेल्या आरोग्यसेवेची वर्षपूर्ती होत आहे. यानिमित्ताने सेंटरच्या वर्धापनदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. या शुभमुहूर्तावर

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language